गोंडगाव घटनेचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – आ. किशोर पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गोंडगाव ता. भडगाव येथील कल्याणी या बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा व अॅड. उज्वल निकम यांची नेमणुक करण्यात यावी यासाठी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन मागणी केली.

आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवुन घडलेल्या घटनेची माहिती देत निवेदन दिले आहे. निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, माझ्या मतदार संघातील गोंडगाव (ता. भडगाव) येथील ८ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निघून हत्या केल्याची अत्यंत दुदैर्वी घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे या खटल्यासाठी राज्याचे विषेश सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आहे. सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा यापुर्वी आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे या खटल्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करावी. तसेच मालेगावचे सरकारी वकील अॅड. शिशीर हीरे यांना या खटल्यासाठी सहाय्यक अभिवक्ता म्हणुन नियुक्त करण्यात यावे ही विनंती. याशिवाय पीडीत बालिकेचे वडील हे दिव्यांग आहेत. त्यांच्या कुटुंबाची परीस्थीती अंत्यत हलाखीची आहे. ही परीस्थीती पाहाता राज्य शासनाकडून या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणुन आर्थिक मदत तातडीने व्हावी अशी मागणी आ. किशोर पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.