किरीट सोमय्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला असून, हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझं असं म्हणणं आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठीशी घालणार नाही. घडलेल्या सर्व प्रकारची चौकशी केली जाईल. कोणताही प्रकरण दाबले जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल.

माता भगिनींना त्रास देणाऱ्या सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का?; अंबादास दानवे
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या व्हायरल व्हिडिओचा मुद्दा मांडला, ते म्हणाले की, “काही लोक ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचे समोर आलं आहे. महामंडळात नितुक्त्या देतो, विधानपरिषदेव घेतो असं सांगितले जात आणि एक्स्टॉर्शन केलं जातं.असच अनेक नेत्यांना देखील ईडी, सीबीआयचे धाक दाखवून पैसै मागितले जातात. अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा व्यक्ती extortion करत आहे. असे उपरे दलाल महाराष्ट्रात येतात आणि महिलांना त्रास देतात. किरीट सोमय्या त्यांचं नाव आहे. माता भगिनींना त्रास देणाऱ्या किरीट सोमय्यांना सरकार सुरक्षा देणार का? मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो. हा माणूस पुन्हा मुंबई पोलिसांना पत्र लिहितो आणि चौकशी करा म्हणतो.”

Leave A Reply

Your email address will not be published.