जळगावातून १२ वर्षीय मुलाचे अपहरण; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील हनुमान नगरमधील रहिवासी असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र मनोज कोळी (वय १२) हा रामेश्वर कॉलनी परिसरातील हनुमान नगर भागात त्याच्या कुटुंबियांसह राहतो. रविवारी १७ एप्रिल सायंकाळी मुलगा घराबाहेर पडला सर्वत्र शोध घेवूनही मिळून आला नाही. तीन दिवस झाले तरी मुलगा मिळून न आल्याने देवेंद्र याची आई लक्ष्मी कोळी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.

दरम्यान मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुलाला आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावरुन बुधवारी एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.