सिड-कियाराचे फोटो समोर येताच, मिम्सचा पाऊस

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बऱ्याच दिवसांपासून सिद्धार्थ (Siddharth) आणि कियारा (Kiara) अडवाणी हे एकमेकांना डेट करत होते याची बातमी कानावर तर प्रत्येकाच्या येत होती पण, ह्या दोघांकडून त्यांच्या नात्याची कबुली मात्र मिळाली नव्हती. पण आता सिद्धार्थ आणि कियारा हे ऑफिशिअली पती-पत्नी झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या बद्दल काही न काही माहिती समोर येतच होती. ७ फेब्रुवारी रोजी हे दोघंही विवाहबंधनात अडकले.

राजस्थानमधील जैसलमेरस्थित सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. मेंदी, संगीत, हळद सेरेमनीनंतर मंगळवारी संध्याकाळी दोघांच्या सप्तपदी झाल्या. या दोघांना वर-वधूच्या रुपात बघण्यास चाहते खूपच आतुर होते. लग्नानंतर रात्री उशीरा सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले.अशा परिस्थितीत जेव्हा लग्नाचा फोटो समोर आले, तेव्हा सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता. लोक म्हणाले ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या तिन्ही स्टुडंट्सना अखेर त्यांचे प्रेम गवसले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.