चिंचखेडा येथे महिलेची निर्घृण हत्या

0

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
एका ३५ वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना चिंचखेडा येथे उघडकीस आली असून यामुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सरलाबाई सुरेश पाटील (वय ३५) असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी जामनेर पोलिसांनी विशाल नाना साबळे ( २३, चिंचखेडे बुद्रुक) याला अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, सरलाबाई सुरेश पाटील यांचे पती सुरेश पाटील हे जामनेर येथे चहाची टपरी चालवतात. त्यामुळे ते जामनेरला निघून गेले होते. तसेच सरलाबाई ह्या घरात दुपारी स्वयंपाक करत असताना विशाल नाना साबळे याने सरलाबाई यांच्या डोक्यात कुठल्यातरी वस्तूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनन्तर आरोपी पसार झाला.हा प्रकार रात्री उशिरा उघडकीस आला. तर घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तपासचक्र फिरवीत अवघ्या काही तासात विशाल नाना साबळे याला अटक करत खुनाचा उलगडा केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.