प्रा.प्रविण दवणे यांनी शब्दातून उभे केले दीपस्तंभ

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
ब्राह्मण सभा जळगावतर्फे शताब्दी महोत्सवातील एक उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व लेखक प्रा.प्रविण दवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाचा विषय हा *दीपस्तंभ – मनातले व जनातले* असा होता.

या विषयाला दवणे यांनी सोप्या भाषेत समजावून .प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीना कोणी दीपस्तंभ हे असतातच . काहींना सर्व ओळखतात तर काही अगदीच अनोळखी असतात.या प्रसंगी त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले काही प्रख्यात व्यक्तींशी त्यांची कशी अचानक भेट झाली व त्यांच्याकडील कोणता गुण हा शिकायला मिळाला.

तसेच अश्या काही व्यक्तींचा उलगडा देखील त्यांनी केला की ज्यांना कोणी ओळखत नाही पण आपल्या आयुष्यात त्यांनी ही दीपस्तंभाचे काम केले. यात अटलबिहारी वाजपेयीजी न पासून लता मंगेशकर , ग.दी.माडगुळकर ते रेल्वेत अचानक भेटलेल्या व्यक्तींने कसे आयुष्यात दीपस्तंभाचे काम केले. हे अगदी रसाळ व मधाळ वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत दोन तास खिळवून ठेवले.

या प्रसंगी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार ब्राह्मण सभा अध्यक्ष सुशील अत्रे यांनी केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी , कोषाध्यक्ष अमोल जोशी , सचिव संदीप कुळकर्णी , केदार देशपांडे , आर.आर वैद्य , दत्तात्रय भोकरीकर , जितेंद्र याज्ञिक , अजय डोहोळे , किरण कुळकर्णी, प्रकाश नाईक , रेखा कुळकर्णी , प्रा. चारुदत्त गोखले यांनी प्रयत्न केले.. सुत्र संचालन सौ.मीरा गाडगीळ यांनी केले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.