कापूस लागवडीत महत्वपूर्ण भाग : बियाण्याची निवड

0

लोकशाही विशेष लेख

शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण खरीप हंगाम ऐन तोंडावर आला असून शेतकरी शेतीच्या मशागतीत व्यस्त होतांना दिसत आहे. मागील पिकांचे अवशेष नष्ट करून नवीन कापूस लागवडीसाठी शेत तयार करण्याची लगबग सगळीकडे सुरू आहे.त्यासोबतच मागच्या वर्षी कोणते बियाणे उत्पन्नात सरस ठरले अशा चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगू लागल्या आहेत. खरीप हंगामची (Kharif season) चाहूल लागताच सर्वच कंपन्याच्या प्रचार गाड्या गावोगावी फिरून आपले वाण कसे सर्वोत्तम आहे हे पटवून देत असतात परंतु बाजारात असंख्य कापूस बी टी वाण बाजारात दाखल झाल्याने कोणते वाण निवडावे हा संभ्रमाच्या प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतोय. “दैनिक लोकशाही” च्या माध्यमातून अनेक शेतकरी हितार्थ लेख आम्ही प्रसिद्ध करत आहोत. याच्या अनेक शेतकऱ्यांना फायदा होत असेलच अशी शाश्वती आहे. खरीप हंगामात महत्वाचे पीक म्हणून कापूस पिकाकडे बघितले जाते. कापूस पिकाचे वाण निवडतांना कोणत्या गोष्टींच्या विचार करावा यासंदर्भात आजच्या हा विशेष लेख

बियाणे हीच चांगल्या उत्पादनाची जननी आहे. बियाणेच जर गुणवत्तापूर्ण नसले तर उत्पन्नाची अपेक्षा फोल ठरते. त्यामुळे कोणत्याही हांगमापूर्वी बियाणे निवड हा अत्यंत महत्वपूर्ण विषय समजला असतो.

कापूस वाण निवडतांना –

१) आज बाजारात अनेक वाण उपलब्ध आहेत यात काही बागायती क्षेत्रासाठी आहेत तर काही कोरडवाहू.बागायती क्षेत्र असल्यास बागायती वाणाचीच निवड
करावी तर कोरडवाहू क्षेत्रासाठी त्याच वाणाची निवड व्हावी कारण पाण्याच्या ताण सहन करण्याची परिपूर्ण क्षमता त्यात असते.
२) कापूस लागवड करत असताना बी जी २ वाणाची लागवड करावी एचटीबीटी वाण शासन प्रमाणित नसून शेतकऱ्यांची फसवणूक होते.
३) आपल्या मागील अनुभवानुसार काही वाण निवडावे तर काही बाजारात नवीन आलेल्या वाणांची आपण निवड करू शकतो कारण नवीन आलेल्या वाणात
विविध प्रतिकारक शक्तीच्या जिन्स ची भर असते.
४) आपल्या भागानुसार तसेच जमिनीच्या पोतानुसार उदा. काळी,मध्यम काळी आदी वाण निवडावे.
५) रोग प्रतिकारक शक्ती जास्त तसेच कीड कीटकांना बळी न पडणार वाण असल्यास फवारणीच्या खर्चात बचत होते.
६) बागायती लागवडीसाठी पुनर्बहारक्षमता असणारा वाण निवडावा.शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते.त्यामुळे
उशिरा लागणा-या बोंडाचा सुध्दा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
७) बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
८) वाण खरेदी करतांना ते गुणवत्ता पूर्ण कंपनीचे आहे की नाही याची अवश्य खात्री करावी.
९) पाण्याच्या कमी आधिक ताण सहन करण्याची क्षमता,वादळी स्थितीत तग धरण्याची क्षमता असणारे वाण लागवड करावे.
१०) अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांची गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापनानुसार लागवड न केल्यास निश्चितपणे चांगले
उत्पादन मिळेल.

याचप्रमाणे “दैनिक लोकशाही” च्या माध्यमातून शेतकरी हितार्थ माहिती पोहचवण्याचा प्रयत्न राहील…बळीराजाला खरीप हंगाम भर भराटीचे जावो याच सदिच्छा…

संकलन – परेश दिलीप पालीवाल
संचालक – श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र लासूर
मो.८३७८०९६३०३

Leave A Reply

Your email address will not be published.