दारूच्या नशेत माथेफिरू जावयाचा सासूवर विळ्याने हल्ला…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जावई दारू पिऊन आल्यानं त्यास घरात घेतले नाही, यामुळे संतप्त जावयाने सासूवर विळ्याने वार करून दुखापत केली तर पत्नीला मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आरएमएस कॉलनीतील कोठारी नगरात घडली आहे. याप्रकरणी १८ मे रोजी सकाळी साडेसात वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लता भास्कर पाटील (५२) रा. आरएमएस कॉलनी, कोठारी नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेजारीच त्यांचे जावाई रावसाहेब दामू पाटील आणि मुलगी जान्हवी हे राहतात. दरम्यान गुरूवारी १८ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रावसाहेब हा दारू पिऊन घरी आल्याने पत्नी जान्हवीने घरात घुसण्यास नकार दिला. घडलेल्या प्रकाराने संतापून रागाच्या भरात सासू लता पाटील यांच्यावर विळ्याने वार करून जखमी केले, तर पत्नी जान्हवीला शिवीगाळ व मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लता पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १८ मे रोजी सकाळी साडेसात वाजता संशयित आरोपी रावसाहेब दामू पाटील याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.