नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन मित्राने केला तरुणीचा खून

0

पुणे : – एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने नऊ लाख रुपयांच्या खंडणीसाठी साथीदारांच्या मदतीने आपल्याच मैत्रिणीचे विमाननगर येथील फिनिक्स मॉलजवळून अपहरण केले. त्यानंतर तिचा चारचाकी गाडीतच खून करून पुणे-अहमदनगर महामार्गावरील कामरगावच्या हद्दीत रस्त्यापासून २०० मीटरवर एका शेतात मृतदेह आधी जाळला आणि नंतर खड्डा खोदून पुरला.

या घटनेची तातडीने दखल घेत विमानतळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुलीच्या मोबाईलच्या लोकेशनच्या माध्यमातून आरोपींचा छडा लावला. तसेच वाघोली येथील कॉलेजमधून मुख्य आरोपी आणि त्याच्या इतरदोन साथीदारांना अटक केली.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, रा. स्टँझा लिव्हिंग, प्रिसो हाऊस, साकोरेनगर, विमाननगर) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी शिवम फुलवळे, सागर रमेश जाधव आणि सुरेश शिवाजी इंदुरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (४९, रा. हरंगुळ, लातूर) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, भाग्यश्री सुडे ही मूळची लातूर जिल्ह्यातील हरंगुळची राहणारी आहे. ती वाघोली येथील जी. एस. रायसोनी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या (संगणक) तृतीय वर्षाला शिक्षण घेत होती. त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि तिच्याच गावाकडचा असल्याने ओळख असणाऱ्या
भाग्यश्रीचे पैशांसाठी अपहरण केले होते. तसेच अपहरण करून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

नऊ लाखांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तरुणीचा मोटारीत खून केला. नंतर हा मृतदेह सुप्याजवळच्या कामरगावच्या शेतात जाळून पुरल्याचे उघडकीस आले आहे. ३० मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास पुण्यातील विमाननगरच्या फिनिक्स मॉलजवळून तिचे अपहरण करण्यात आले होते. ३० मार्च रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास कॉलेजवरून ती विमाननगर येथील साकोरेनगर येथे राहत असलेल्या रूमवर आली होती. त्यानंतर ती रात्री नऊच्या सुमारास फिनिक्स मॉलमध्ये गेली. मॉलमधून बाहेर पडल्यानंतर तिला शिवम, सागर आणि सुरेश या मित्रांनी सोबतवारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याशी संपर्क होत नव्हता. तिचा फोन बंद येत होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चंदन, योगेश थोपटे, सचिन जाधव, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रूपेश तोडकर, उमेश धेंडे, रिहान पठाण, ज्ञानेश्वर आवारी आणि किरण खुडे यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.