एकनिष्ठा फाउंडेशननी रुग्णास मोफत आरोग्य सेवा मिळवून दिली

0

खामगांव(;- येथील रुग्णसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशनची अशी ही सेवा वडाळी येथील रहिवाशी संदीप फासे यांचा मुलाची तब्येत बरी नव्हती त्यांनी खासगी दवाखान्यात दाखविले असता डॉक्टरांनी तपासण्या करायला सांगितले त्यांनी नांदुरा येथे तपासणी केले व औषधोपचार केले परंतु तब्येतीमध्ये सुधार होत नव्हते मग नंतर संदीप फासे है बुलढाणा येथे एका खासगी दवाखान्यात मुलाला घेऊन गेले तिथे तपासण्या करून डॉक्टरला दाखविले असता डॉक्टरनी रुग्णास भरती करण्यास सांगितले व तसेच 25 ते 30 हजार रुपये खर्च येणार पुढे अजून काही खर्च वाढू शकते तुमची तयारी असेल तर भरती करा आत्ताच असे सांगताच त्यांनी सरळ खामगांव गाठले आणि ही सर्व माहिती एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना माहिती देताच त्यांनी रुग्ण चि. दिपक संदीप फासे वय 11 वर्ष याला सामान्य रुग्णालय येथे दिनांक 29 में रोजी सकाळी वार्ड क्रमांक 2 मध्ये भरती केले सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार करून रुग्ण दिपक याची तब्येत 3 दिवसात ठणठणीत करून दिनांक 31 में रोजी सुट्टी दिली. एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे माझ्या मुलाला खामगांव येथे मोफत आरोग्य सेवा मिळाला म्हणून माझ्या मुलाची तब्येत बरी झाली व त्यांच्यामुळे आमचे पैसे वाचले अशी प्रतिक्रिया संदीप फासे यांनी सामान्य रुग्णालयात व्यक्त केली ही माहिती कुंदन यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.