आ. एकनाथराव खडसे यांचा आ. मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा

0

जळगाव ;- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला असून आज शनिवारी पहिल्या सुनावणी दरम्यान आ. एकनाथराव खडसे यांनी आपला जबाब नोंदविला.

१५ जुलै शनिवारी एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली. न्यायालयाने खडसेंचे म्हणणे ऐकून घेतले असून, या खटल्याची आता पुढची सुनावणी सुरू होणार आहे.

राजकीय टीकाटिप्पणी करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथराव खडसेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यानंतर खडसेंनी अब्रू नुकसान केली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, त्या नोटिसीला त्यांनी कोणतंही उत्तर न दिल्याने खडसेंनी आता हा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या कामासाठी खडसे शनिवारी न्यायालयात हजर झाले होते. भादंवि कलम 500 आणि 66 अ अंतर्गत मंगेश चव्हाण यांना अब्रू नुकसान केल्याप्रकरणी शिक्षा व्हावी तसंच 51 हजार रुपयांचा प्रतिकात्मक स्वरूपात दंडही करावा, अशी मागणी एकनाथराव खडसेंनी न्यायालयाकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.