लोकप्रिय कॉमेडी शो ‘लापतागंज’मधील ‘या’ अभिनेत्याचं निधन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘लापतागंज’मध्ये (Lapataganj) चौरासियाची भूमिका साकारणारा अभिनेता अरविंद कुमारच (Arvind Kumar) हृदयविकारच्या झटक्याने निधन झालं. मिलेल्या माहितीनुसार ते शूटिंगसाठी जात असतांना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनतर ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. व डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सूत्रांनुसार, अरविंद कुमार यांच्या निधनाची माहिती सहकलाकार रोहितास्व गौड यांनी दिली. याविषयी त्यांच्या पत्नीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहीत भावना व्यक्त केल्या आहे. आर्थिक समस्यांमुळे ते फार तणावात होते अशी माहिती रोहितास्व गौड यांनी दिली. रोहितास्व गौड आणि अरविंद कुमार यांनी ‘लपटागंज’ मालिकेत एकत्र काम केलं होत. पुढे ते म्हणाले, “होय हे खरे आहे. दोन दिवसांपूर्वी अरविंदचं निधन झालं आहे. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.