के.सी.ई अभियंत्रिकीत “कार्य संस्कृती” वर व्याख्यान उत्साहात

0

जळगाव : प्रतिनिधी
कार्य संसृकृतीतूनच ध्येय प्राप्ती शक्य आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपली कार्य पद्धती संस्कृतीची जोड देऊन ठरवावी व ती आचरणांत आणावी असे आव्हान प्रा.नितीन मटकरी यांनी केले. महाविद्यालयातील विज्ञान आणि मानवता विभागातर्फे आयोजित व्याखयानात ते बोलत होते यावेळी मंचावर प्राचार्य संजय सुगंधी,शैक्षणिक संचालक संजय दहाड अकॅडेमिक डीन प्रज्ञा विखार हे उपस्थित होते. सुरवातीस प्रास्ताविक व भूमिका विभाग प्रमुख के बी पाटील यांनी मांडली आपल्या व्याख्यानात त्यांनी ज्ञानासोबतच कौशल्येही प्राप्त करण्याची गरज आहे. त्यासाठी कोर्पोरेट कार्य पद्धतीचा कार्य संस्कृतीचा अभ्यास करून त्यातील काही बाबी आपण आपल्यात रुजवाव्या यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न करावे असे सांगितले. वेगवेगळ्या कोर्पोरेट उद्योगांच्या कार्यसंस्कृती,तंत्रज्ञानाचा बदलता परीघ आणि त्या सोबत आपली अप डेट राहण्याची मानसिकता या बाबत त्यांनी उदाहरणे व दाखले देऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्यातील संवाद,भाषा कौशल्ये यासोबतच सादरीकरणावरही लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. प्रा संजय कुमावत, प्रा अविनाश जाधव यांनी सहकार्य केले. यावेळी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.