जळगावात नाविन्यपूर्ण उपक्रम…रात्र कालीन महाविद्यालय…!

0

जळगाव – गत 75 वर्षापासून खान्देश कॉलेज सोसायटी एक शैक्षणिक प्रगल्भ चळवळ कार्यरत आहे. त्यात अधिक भर म्हणून नाविन्यपूर्ण असे कान्ह कला आणि वाणिज्य रात्रकालीन(नाईट) महाविद्यालय मूळजी जेठा महाविद्यालय परिसरात सुरू केले आहे. त्यास कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची मान्यता आहे या महाविद्यालयाचा दररोज सायंकाळ पाच ते आठ वाजेपर्यंत नियमित वर्ग चालतील आणि अनुभवी तज्ञ प्राध्यापकांचे सतत मार्गदर्शन मिळेल.
प्रथम वर्ष कला यात मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संगीत, नाट्य शास्त्र हे विषय असतील तर वाणिज्य शाखेत मराठी, हिंदी, इंग्रजी, अकाउंटिंग, ऑडिटिंग, चिटणीसाचा व्यवसाय, विमा बँकींग यासारखी विषय असतील.

या महाविद्यालयात कोण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील..?
बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. केंद्र, राज्य सरकार, जिल्हा परिषद यांच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल. मित्रांनो, या स्पर्धात्मक युगात आपल्या क्षमता आणि कौशल्य विकसित करून आपले उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय आणि उच्च पद प्राप्ती करू शकतात. त्याकरिता हे रात्रकालीन महाविद्यालय उत्तम संधी आहे. काही विद्यार्थी दहावी, बारावी उत्तीर्ण होऊन नोकरी व्यवसाय करतात.सहकार विभाग, सरकारी कार्यालय, न्याय विभाग, बँक, विमा, बांधकाम विभाग, इरिगेशन विभाग,औद्योगिक क्षेत्र, कारखाने, महानगरपालिका, जिल्हा परिषद या क्षेत्रात कार्य करीत असतात. त्यांना आपले काम सांभाळून पुढील उच्च शिक्षण घेण्याची रात्र कालीन महाविद्यालय उत्तम संधी आहे. शिवाय वाणिज्य शाखेत जे विद्यार्थी खाजगी, व्यापारी दुकाने, मॉल,चार्टर्ड अकाउंटंट, बँका,सहकार विभाग, हिशोब तपासण्याचे, लिखाणाची कार्य करीत आहे. ते या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात. अर्थात फ्रेश विद्यार्थ्यांनाही या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. मित्रहो, जळगाव शहरात राज्य कालीन महाविद्यालय नवीन उपक्रम असला तरी औद्योगिक,कॉर्पोरेट शहरात मात्र (पुणे, मुंबई, दिल्ली) ही संकल्पना भरभराटीस आलेली आढळते. जसे पुण्यात लॉ कॉलेज, वाणिज्य, कला,बी.एड, एम एड या शाखेत हजारो विद्यार्थी लाभ घेत आहेत. जळगाव व आसपासच्या विद्यार्थ्यांनी विशेषतः जळगाव एमआयडीसी येथे कार्यरत असल्याने त्वरित प्रवेश घ्यावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन  मंडळ, बँक भरती केंद्र, विमा, रेल्वे यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांना उत्तीर्ण होण्यासाठी आपली क्षमता वाढवून ध्येयपूर्ती करावी. आजच्या धकाधकीच्या जीवनात कमवा शिकवा ही संकल्पना अमेरिका युरोप या पाश्चात्त्य देशात रुजलेली आहे मात्र जळगावात ही संकल्पना रुजवात होत आहे. त्याकरिता पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी रात्र कालीन महाविद्यालय ही संधी आहे. आपण आपल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे प्रथम श्रमास प्राधान्य देतो आणि शिक्षण मागे पडते. तेव्हा श्रमा बरोबर शिक्षण घेण्याकरिता रात्रकालीन महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात क्रीडांगण,वाचनालय, निबंध लेखन, वाद विवाद स्पर्धा,सांस्कृतिक क्षेत्र यातही उत्तम संधी आहे. हे ध्यानात घ्या. शिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा, पूर्वतयारी, मुख्य परीक्षा, सब इंस्पेक्टर, इन्कम टॅक्स इंस्पेक्टर,पोलीस, सीमा सुरक्षा बल, बँक, विमा आदी क्षेत्रात पद मिळवण्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन सहाय्यक पुस्तके आपणास उपलब्ध आहेत. शिवाय संगणक साक्षरता होण्याची पात्रता प्राप्त करण्यासाठी खास विशेष प्रयत्न करण्यात येतील. तेव्हा सर्व होतकरू विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा.प्रवेश घ्या. अधिक चौकशी करता संपर्क प्राध्यापक एन.व्ही. भारंबे कान्ह कला आणि वाणिज्य महाविद्यालय मूळजी जेठा महाविद्यालय परिसर जळगाव येथे संपर्क करा.
– प्रा. एन.व्ही. भारंबे

Leave A Reply

Your email address will not be published.