पुण्यात नवरदेवाने थेट एका व्यक्तीच्या काळजात घातली कट्यार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे शहरात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट एका व्यक्तीच्या काळजात कट्यार घुसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ वादातून विवाह समारंभात वराने मंगल कार्यालय चालकावर कट्यारने वार केला. त्यामुळे विवाहाच्या दिवशीच नवरदेवाने गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. करण सणस यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अभिजित मिरगणे, राहुल सरोदे यासह इतर ५ ते ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणस यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील उरळी कांचन भागात श्रीकृष्ण मंगल कार्यालय आहे. हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मंगल कार्यालयात घडला. या ठिकाणी आरोपी नवरदेव अभिजित याचा विवाह संपन्न झाला होता.

विवाह समारंभानंतर अभिजित आणि नातेवाईक स्टेजजवळ टेबल-खुर्ची मांडून जेवण करत होते. त्यामुळे तेथून इतर काही जणांना जे-जा करता येत नव्हती. मंगल कार्यालय चालक सणस यांनी अभिजीत आणि नातेवाईकांना टेबल-खुर्ची सरकावण्यास सांगितले. या कारणावरून अभिजीत आणि त्याच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी सणस यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.