WhatsApp ची ‘ही’ मोफत सेवा होणार बंद, खिशाला बसू शकते कात्री

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

WhatsApp ही जगभरात वापरले जाणारे मॅसेजिंग ॲप आहे. कोट्यवधी युझर्स या ॲपवर दररोज एकमेकांना मॅसेज पाठवतात. जास्तीत जास्त युझर्स मोफत त्यांची चॅट, फोटो आणि व्हिडिओचे बॅकअप घेतात. हे बॅकअप गुगलच्या क्लाऊड स्टोरेजवर सेव्ह असते. पण ही बॅकपअची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युझर्सला यावर्षात पैसे मोजावे लागू शहतात. गुगलने याविषयीचे संकेत अगोदरच दिले आहेत. याविषयीचा निर्णय अजून जाहीर करण्यात आला नाही.

काय होईल बदल
वर्ष २०२३ मध्ये गुगलने एका महत्वाची माहिती दिली होती. त्यामध्ये व्हॉट्सॲपमध्ये लवकरच होणाऱ्या बदलाची माहिती देण्यात आली होती. या बदलामुळे युझर्स गुगल ड्राइव्हर मोफत मिळणारी अमर्यादित जतन करण्याची सेवा बंद होईल. एकदा स्पेस भरल्यानंतर क्लाउड स्टोरेजसाठी युझर्सला पेमेंट करावे लागेल. अथवा त्याचा महत्वाचा डेटा डिलिट करावा लागेल. त्यासाठी व्हॉट्सॲपने पण तयारी केली आहे.

अतिरिक्त स्टोरेजसाठी करावे लागेल पेमेंट
गुगल ड्राइव्ह वर अतिरिक्त स्टोरेज करण्यासाठी पेमेंट करावे लागते. त्यासाठी गुगलचा वन प्लॅन आहे. युझर्स त्यांच्या गरजेनुसार स्टोरेजचा पर्याय निवडू शकतात. गुगलचा मासिक आणि वार्षिक प्लॅन आहे. या दोन्ही श्रेणीत तीन-तीन प्लॅन आहे. मासिक बेसिक प्लॅनमध्ये १००GB डेटा मिळतो. त्यासाठी युझर्सला ३५ रुपये प्रति प्रति महिना द्यावा लागतो. हा प्लॅन तीन महिन्यांसाठी आहे. त्यानंतर त्याला या सेवेसाठी 130 रुपये मोजावे लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.