उस्ताद रशिद खान यांचे वयाच्या ५५व्या वर्षी निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

संगीत उस्ताद म्हणून ओळखले जाणारे उस्ताद रशिद खान यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले आहे. उस्ताद राशिद खान हे काही काळापासून कर्करोगाशी लढत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होत. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

उस्ताद राशिद खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदायू मध्ये झाला होता. सुरुवातीला त्यांनी आआपले आजोबा उस्ताद निस्सार हुसैन खान (१९०९-१९९३) यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे ते पुतणे होते. गुलाम मुस्तफा खान यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना मुंबईत मध्ये संगीत शिक्षण देण्यास सुरुवात केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.