ब्रेकिंग: कॅटरिना कैफ- विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बाॅलिवूडमध्ये (Bollywood) खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ (Actress Katrina Kaif ) आणि तिच्या पती विकी कौशल (Vicky Kaushal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या अगोदर सलमान खानला (Salman Khan) धमकी देण्यात आली होती. कॅटरिनासोबत तिचे पती अभिनेता विकी कौशल यालासुद्धा धमकी दिली आहे. या प्रकरणी संताक्रुज पोलीस ठाण्यात (Santacruz Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार विकी कौशलने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आयपीसी कलम ५०६ (२), ३५४ (डी), ६७ आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक व्यक्ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन धमकावत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.