निंबा देवी धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी; प्रशासनाचे दुर्लक्ष

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहिगाव ता. यावल (Yawal) येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वतातील (Satpuda) सावखेडा सिम येथील निंबादेवी धरणावर (Nimbadevi Dam) पर्यटकांची तोबा गर्दी झालेली असल्याने ढोल ताशांच्या गजरात पर्यटक आनंद लुटत आहेत. या गर्दीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली मिळालेली दिसून आलेली आहे.

सावखेडा शिवारातील या निंबा देवी धरणात पाणी ओसांडू लागल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्यासह परराज्यातील पर्यटकांची येथे गर्दी होत आहे.  दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनधारकांनी वाहने लावलेली होती. तर हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे दाखल झालेले होते. याठिकाणी अनेक दुकाने ही थाटलेली आहेत.

मात्र येथे वन विभागाचे कर्मचारी आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी दिसून आलेले नाहीत. पोलीस बंदोबस्त मोजक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे हे यावरून स्पष्ट दिसून आलेले आहे. या तोबा गर्दीला शिस्त लागावी अशी मागणी मात्र परिसरातून होत आहे. ढोल ताशांच्या गजरात पर्यटक आनंदही लुटत असल्याचे दिसून आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.