जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात “क्लाउड कॉम्प्युटिंग” या विषयावर कार्यशाळा

0

जळगाव ;- संगणकावरची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्लाउड कॉम्प्युटिंग हा एक योग्य पर्याय आहे. हॅकिंग तसेच संगणकात बिघाड झाल्यास डाटा रिकव्हरीची शाश्वती असते. माहिती जतन करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे क्लाउड कॉम्प्युटिंग असल्याने भविष्यात याचा वापर वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी या पर्यायाचा वापर करणे शक्य असल्याचे मत क्लाउड कॉम्प्युटिंग ट्रेनर कुशल मिश्रा व शिवप्रसाद पटेल यांनी येथे केले.

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात बॅचलर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन विभाग व मेक इंटर्न अॅण्ड ई-सेल आयआयटी खरगपूरतर्फे “क्लाउड कॉम्प्युटिंग” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद‌्घाटन रायसोनी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांच्या हस्ते झाले तर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे, प्रा. रफिक शेख, प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. रुपाली ढाके, प्रा. विनोद महाजन, प्रा. जितेंद्र कुमार, प्रा. ऐश्वर्या परदेशी प्रा. वैशाली चौधरी, प्रा. अश्विनी भोळे, प्रा. हर्शिदा तलरेजा, प्रा. मानसी दुसे, प्रा. मनीषा देशमुख आदींनी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

 

विद्यार्थ्यांचा अभ्यासपूर्ण सहभाग

बॅचलर ऑफ कंप्यूटर एप्लीकेशन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सलग तीन दिवस ही कार्यशाळा सुरू राहणार असून, त्यात महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक, तसेच संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी माेठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. कार्यशाळेत आयआयटी खरगपूर येथील ट्रेनर कुशल मिश्रा व शिवप्रसाद पटेल हे विद्यार्थ्यांना क्लाउड कॉम्प्युटिंगविषयी मार्गदर्शन करीत आहे. बिग डाटा, स्कूप आणि क्लाउड कॉम्प्युटिंग या तंत्रज्ञानाचा वापर प्रकल्प तयार करण्यासाठी कशाप्रकारे केला जातो, याबाबतची प्रात्यक्षिके यावेळी दाखविण्यात आली. जेणेकरून विद्यार्थ्यांना माहिती सुरक्षित ठेवण्यासाठीचा सुरक्षित पर्याय वापरणे शक्य हाेईल अाणि त्यांच्या विविध गाेष्टींची महत्त्वाची माहिती मिळू शकेल.

 

क्लाउड कॉम्प्युटिंग – नव्या युगाची नवी कौशल्ये

संगणकाचा वापर करताना प्रथम महत्त्वाची माहिती कोणती आहे, ते ठरवून त्याला किती जागा लागेल हे पहा. ऐनवेळी संगणक किंवा हार्डडिस्क खराब झाल्यास माहिती जाण्याचा धोका असतो. त्यामुळे माहिती संकलित सुरक्षित करण्यासाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो. क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये सेवा देणारी कंपनी चांगली असेल तर सुरक्षा वाढते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.