‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद?… वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) सर्वांनाच पसंतीस पडणारा आहे.  शो ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून, बघता बघता शो चे चार सीजन आपण पाहिले. पण या सिजनला पूर्णविराम लागणार आहे. खुद्द कपिल शर्मा ने इस्ट्राग्राम वर अर्चना पुरणसिंग (Archana Puran Singh) यांच्या सोबत फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. बॉलीवूड चित्रपटांचे प्रमोशन करणारा चित्रपट अशी या शोची ओळख काही महिन्यांपासून झाली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यावर टीकाही भरपूर प्रमाणावर केली होती.

तसेच ज्यावेळी मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र त्या शो च्या निर्मात्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे यापूर्वी दिसून आले होते. अशातच बॉलीवूडमधील काही निर्मात्यांनी या शो वर टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.