प्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे दुःखद निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं निधन झालं आहे. लीलावती यांनी वयाच्या ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लीलावती यांनी तामिळ आणि तेलुगूसोबतच ६०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारून, प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अभिनेत्री लीलावती यांचे नेलमंगला येथील एका खाजगी रुग्नालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान लिलावती यांचं निधन झालं. लीलावती यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. लिलावती यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लिलावती यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्याकाही दिवसांपासून लीलावती यांची प्रकृती खालावली होती. अनेक आजारांशी त्यांची झुंज सुरु होती. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८५ वर्षीय लीलावती दीर्घ आजाराने त्रस्त होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली 
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. मोदी महाले, “महान कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनयाने रुपेरी पडद्याची शोभा वाढवली. त्यांच्या विविध भूमिका आणि उल्लेखनीय प्रतिभा नेहमीच स्मरणात राहिल. ” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.