दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले

0

जळगाव ;- येथील एमआयडीसी मधील सुप्रीम कंपनी गेट समोर दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी मालवाहू रिक्षा चालकाला थांबवून त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे लांबवून पोबारा केल्याची घटना ८ रोजी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली . या प्रकरणी रिक्षा चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे राहणारे गोपाल एकनाथ शिंदे वय 37 हे मालवाहू रिक्षा चालक असून ते ८ रोजी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास सुप्रीम कंपनी समोरून जात असताना अचानक दोन अनोळखी तरुणांनी दुचाकीवरून त्यांची कॉलर पकडून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या पाठीमागील खिशातून पाकीट काढले. यात साडेतीन हजार रुपये रोकड ,ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्,ड रिक्षाच्या आरसी बुक आदी महत्त्वाची कागदपत्रे काढून नेत रिक्षा चालक गोपाल शिंदे यांना ढकलून पळून गेले. गोपाल शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला धाव घेऊन दोन अनोळखी तरुणांविरुद्ध फिर्यादी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.