कंगना रनौतचा ‘चंद्रमुखी 2’ चित्रपट सप्टेंबर महिन्यात होणार प्रदर्शित

0

मुंबई ;- पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, अशातच कंगनाच्या ‘चंद्रमुखी 2’चित्रपटाची देखील तारीख समोर आली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे.

कंगनाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये राघव लॉरेन्स लूकमध्ये आहे. तो एका मोठ्या दरवाजाच्या किहोलमधून डोकावताना दिसला. ‘चंद्रमुखी 2’ चे पोस्टर शेअर करताना कंगनाने सांगितले केली की ‘चंद्रमुखी 2’ या गणेश चतुर्थीला प्रदर्शित होणार आहे. तिने लिहिले की, ‘या सप्टेंबरमध्ये ती परत येत आहे. तुम्ही तयार आहात का चंद्रमुखी 2’ असं कंगनाने लिहिलं आहे.

दरम्यान, हा चित्रपट गणेश चतुर्थीला 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पी वासू दिग्दर्शित, ‘चंद्रमुखी’ हा ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट चंद्रमुखीचा सीक्वेल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटाची कथा जोडप्याभोवती फिरते, जे अनेक वर्षांनंतर त्यांच्या बंद वडिलोपार्जित घरात राहायला येतात, जिथे त्यांच्यासोबत अनेक घटना घडू लागतात आणि त्यानंतर हे जोडपे डॉक्टरांना बोलवण्याचा निर्णय घेतात.

Leave A Reply

Your email address will not be published.