Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»ओरायन सी.बी.एस.ई. स्कूल मध्ये भरला वारकऱ्यांचा मेळावा
    शैक्षणिक

    ओरायन सी.बी.एस.ई. स्कूल मध्ये भरला वारकऱ्यांचा मेळावा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 30, 2023Updated:June 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव;- के.सी. ई. सोसायटी संचलित ओरायन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम स्कूल येथिल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात आषाढी एकादशी निमित्त वारक-यांचा मेळावा भरविला होता. प्राथमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठू माऊली तसेच रुक्मणी माऊली आणि वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेली होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा जयघोष, टाळ मृदंगाच्या गजरात, खांदयावर भगवी पताका व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले वारकरी विद्यार्थी अशा भक्तिमय वातावरणात बुधवारी सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.

    ओरायन सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई यांची पालखी काढून, भजन-भावगीत, लेझिम व नृत्य सादर केले. अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या व मराठमोळ्या पारंपारिक वेषात उपस्थित होते. विठ्ठल रूक्मिणी चा वेश धारण केलेले विद्यार्थी दिंडीच्या अग्रभागी होते. मुख्याध्यापिका सुषमा कंची यांच्यासह प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी विठ्ठल रुखमाई च्या प्रतिमेचे पूजन केले. विठुरायाचे अभंग आणि ज्ञानोबांचे पसायदान गाऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कुडे आणि पुनम सुर्वे यांनी केले. तसेच स्वाती पाटील मॅडम यांच्याकडून आभार प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

    jalgaon Orayan CBSE school
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नीट परीक्षा 2026 ची परीक्षा अचानक रद्द!

    May 12, 2026

    रायसोनी महाविद्यालयात रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

    May 3, 2026

    शिक्षणाच्या नावाखाली लूट खपवून घेणार नाही : नगरसेवक अनिल पडोळे

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif