ईदनिमित्त नाशिक शहरात वाद, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

हिंदू-मुस्लिम यांच्यातला तेढ कमी न होता अजून वाढत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक (Nashik) शहरात ईदनिमित्त (Eid) शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी नाशिक शहराऐवजी गुलशनाबाद नावाचे फलक दिसून आले होते. यावरून सर्वत्र मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

काय म्हणाले दादा भुसे
पालकमंत्री दादा भुसे आज नाशिक शहरात दखल झाले होते. यावेळी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी बैठक पार पडली. यानंतर त्यांनी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले, नाशिक शहरात ईदनिमित्त होर्डिंग्स लावण्यात आले होते. यातील एका होर्डिंग वर गुलशनाबाद असे नाव देण्यात आले होते. यावेळी शहरात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे दादा भुसे म्हणाले “माझ्या कानावर हि बाब आली असून पोलिसांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे हि त्यांनी सांगितले आहे. हि खोडसाळ प्रवृत्ती असून अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.