जळगावात युवकाने घेतला नैराश्यातून गळफास

0

जळगाव;– एका २३ वर्षीय युवकाने नैराश्याच्या भावनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कासमवाडी परिसरात आज दुपारी उघडकीस आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललित कैलास पवार (वय २३, रा. कासमवाडी, जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत युवक हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी कंत्राटी कक्षसेवक म्हणून कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून
तो आई, वडील, भाऊ, बहिणीसह राहतो. ललित पवार हा शुक्रवारी ३० जुन रोजी दुपारी घरी होता. त्यावेळी कुठल्यातरी नैराश्याखाली त्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय व नागरिकांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.

यानंतर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांनी आक्रोश केला . एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.