कामायनी एक्स्प्रेसमधून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0

पाचोरा : भुसावळातील रहिवासी व हल्ली शहरातील नागसेन नगरमधील रहिवासी कुणाल प्रकाश अहिरे (वय ३८) हे १३ जानेवारीला कामानिमित्त पाचोरा येथून नाशिक येथे जात होते. कामायनी एक्स्प्रेसने प्रवास करताना दुपारी ५.१० वाजेच्या सुमारास पाचोरा ते तारखेडा तारखेडा दरम्यान रेल्वे खंबा क्र.३६८/१८ अप जवळ रेल्वेतून पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला

 

.या घटनेची माहिती मिळताच पाचोरा रेल्वे दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार यांनी रुग्णवाहिकेसह चालक बबलू मराठे यांना घेत घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन प्रकाश पाटील, संदीप पाटील यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवला. तेथे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.