कजगावात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा ऐवज लुटला…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा पडला असल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या दरोड्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करीत सोने-चांदीसह अंदाजे दहा लाखाचा ऐवज लूटून नेला.

कजगाव ता.भडगाव येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व रेल्वे स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरांवर सात-आठ दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. चव्हाण व देशमुख कुटूंबास मारहाण केली. नंतर कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लूटून नेली.   घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक दाखल झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.