पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत श्रमदान उपक्रम उत्साहात संपन्न !

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

दि. १ ऑक्टोबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत’ एक तारीख एक तास श्रमदान उपक्रम साजरा करण्यात आला.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता पंधरवाडा हा कार्यक्रम सफल करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून, २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे. प्रशासनाने स्थानिक शाळा व महाविद्यालयांना केलेले आवाहन लक्षात घेवून त्या पार्श्वभूमीवर पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी पोदार स्कूलच्या परीसरात एक तास श्रमदान करण्यात आले.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी शाळेत उपस्थित राहून शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तसेच विद्यार्थी व पालकांनादेखील आपल्या परिसरात स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी असून खेड्यांपासून ते शहरांपर्यंत स्वच्छ भारताचे चित्र दिसावे म्हणून जनभागीदारी कार्यक्रमांतर्गत उपरोक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. फक्त स्वच्छता कर्मचारी यांची ही जबाबदारी नसून प्रत्येक भारतीयाची आहे, असा आवर्जून उल्लेख प्राचार्य गोकुळ महाजन यांनी केला. स्वच्छतेसाठी श्रमदान हा जनआंदोलनाचा अविभाज्य भाग असून प्रत्येक जबाबदार नागरिकाने यात आपले योगदान दिले पाहिजे असा आग्रह धरला. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन,  उप-प्राचार्य दिपक भावसार ,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.