जळगाव-;- येथील जिल्हा परिषदमध्ये भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात असणारे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणी साठी अनेक वेळा निवदेन तक्रारी देऊनही न काढल्याने भूषण पाटील नावाच्या युवकाने आज दुपारी एका वाजेच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली होती.
भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारदार भूषण नामदेव पाटील, स्वप्निल प्रल्हाद पाटील, चेतन रवींद्र पाटील आणि जीवन प्रभाकर चव्हाण सर्व रा. कजगाव ता. भडगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भडगाव तहसील कार्यालय, पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार निवेदन तक्रारी व अर्ज केलेले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, यासंदर्भात यापूर्वी या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी देखील खोटे आश्वासने देऊन जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने मंगळवार २० जून रोजी दुपारी १ वाजता जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर तक्रारदार भूषण नामदेव पाटील याने आज मंगळवारी २० जून रोजी दुपारी १ वाजता अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याला ताब्यात घेतले आहे.