जळगावात जुगार अड्ड्यावर धाड ; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

0

जळगाव : – शहरातील ट्राफीक गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करीत रोख रकमेसह सदूयाचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सुभाष रामभाऊ सोनवणे (वय ६२, रा. चौघुले प्लॉट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील ट्राफीक गार्डन परिसरात एका झाडाखाली सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावरून सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली असता तेथे सुभाष सोनवणे हा सट्टा जुगार चालवित असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून रोख १९० रुपयांसह सद्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोकॉ प्रवीण पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुभाष सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.