१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0

जळगाव : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी तिच्या कुटुंचियांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसह वास्तव्यास आहे.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून तिला पळवून नेले. ही घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलगी घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलीबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांनी शनिवार, ३० डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि रूपाली महाजन करीत आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.