मुंबईत हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 12 महिलांसह 45 जणांना अटक

0

मुंबई:- शहर गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे खारमधील फोर-बीएचकेवर छापा टाकला आणि जुगार खेळण्याच्या आरोपाखाली 12 महिलांसह 45 जणांना अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांची प्लास्टिकची नाणी आणि 34 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
रहिवासी इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळाली.

खार पश्चिम येथील आंबेडकर रोडवर असणाऱ्या ओम पॅलेस या सोसाटीमध्ये अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळताच शनिवारी मध्यरात्री एक वाजता दया नायक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी फ्लॅटमध्ये अनेक महिलांसह पुरुष जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.

गुन्हे शाखेचे पथक येथे पोहोचले असता त्यांना फ्लॅटमध्ये थ्री-कार्ड रमी, पोकर यासारखे खेळ सुरू असल्याचे दिसले. मोठमोठी रक्कम लावून हा जुगार खेळला जात होता. हा जुगाराचा अड्डा चार भागिदारांमध्ये चालवला जात होता आणि तीन वेगवेगळ्या टेबलवर जुगार सुरू होता. जुगार खेळणे सुकर व्हावे म्हणून ग्राहकांना विविध रंगांची आणि किंमतींची प्लॅस्टिकची नाणी देण्यात आली होती. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी 3 जॉकीही ठेवण्यात आले होते.

फ्लॅटचा मालक समीर आनंद पोलिसांच्या वॉन्टेड श्रेणीत असून त्याच्यासह जॉकी आणि ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे. समीरच्या ताब्यातून 50 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. यासह जुगार खेळणाऱ्यांकडून 35 लाख रुपये रोख आणि 1 कोटी 1 लाख 50 हजार किंमतीची जुगाराची नाणी पोलिसांनी जप्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.