जॉय, शेअर आणि केअर रोटरी क्लबची ‘दादा’ दिवाळी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

“नन्हे मुन्ने बच्चे ‘तेरी मूठठी मे क्या है” हे गाणं नकळत डोळ्यसमोर आलं. अगदी चित्ररूपात ते रिंगणगाव येथील बालसुधार गृहात दिवाळी फराळ वाटप करतांना. तर “हमारी मुठ्ठी मे किस्मत हमारी जब भी खुलेगी चमकेगा तारा” याचा अनुभव जळगाव येथील बालसुधार गृह येथे दिवाळी फराळ वाटप करतांना आला. आजचं ही दोन गाणे आठवावी याचं कारण रोटरी क्लब आणि यातील काही मजबूत मंडळी वैचारिक आणि आर्थिक सुद्धा अर्थात दादा मंडळी.

दादा म्हणजे दायित्व आणि दातृत्व यांचा सुंदर मिलाफ. दिवाळी फराळ आणि फटाके यांच वाटप खरोखरच गरजू मुलांना द्यावे हा विचार मागचा एक आठवडा सुरु होता, त्यातच 3 माजी अध्यक्षांनी लक्ष वेधले ते रिंगणगाव येथील बालसुधार गृह आणि त्यांच्या गरजा चर्चा संपते न संपते लागणारा पैसा, दिवस आणि काय देता येईल यावर ठाम निर्णय झाला. लगेच दिवाळीत रविवारी 23 तारखेला जॉय शेअर आणि केअर दादा दिवाळी चा मुहूर्त ठरला. रिंगणगाव येथे दिवाळी फराळा सोबतच 6 पोती गहू देण्यात आला.

रोटरी क्लब जळगाव चे अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुलकर्णी, सर्व माजी अध्यक्ष: डॉ जयंत जहागीरदार, संदीप शर्मा, नितीन विसपुते, कॅप्टन मोहन कुलकर्णी, मेम्बर्स: दिनेश गांधी, मनोज जोशी,  सुबोध सराफ, मुकेश महाजन, पंकज व्यवहारे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.