धक्कादायक; ऐन दिवाळीच्या दिवशी १४ वर्षीय बालकाचा सुतळी बॉम्ब फोडतांना मृत्यू…

0

 

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील जुने परिसरात ऐन दिवाळीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सुतळी बॉम्ब फोडताना बालकाचा मृत्यू झाला. काल सायंकाळी ही घटना घडली.

सोनू कैलास जाधव (14) रा. बर्फ कारखाना परिसर, आदिवासी वस्ती, जुने धुळे. असे मयत बालकाचे नाव आहे. सोनू हा काल घराजवळ फटाके फोडत होता. त्याने सुतळी बॉम्ब लावून त्यावर स्टीलचा ग्लास ठेवला. बॉम्बचा फुटताच स्टीलच्या ग्लासचे तुकडे झाले. त्यातील एक तुकडा थेट या सोनूच्या छातीत घुसला. त्यानंतर युवक पळतच घराकडे आला आणि जमिनीवर कोसळला.

सदर घटना कळताच कुटुंबियांसह शेजारी पाजारी त्याच्याजवळ पोहोचले. त्याला लागलीच रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत कुटुंबीयांवर मुलगा जाण्याचा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.