जियोचे नेटवर्क गायब; इंटरनेट बंद, फोनही लागत नसल्याने युजर त्रस्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात मोठ्या प्रमाणात जियो नेटवर्कचे युजर आहेत. सध्या जियोचे नेटवर्क गायब झाले असून अनेक युजर त्रस्त झाले आहेत. मोबाईलवर जियोचे नेटवर्क नसल्याने युजर मोबाईल इंटरनेट वापरू शकत नाही तसेच फोनही करू शकत नाहीत. ट्विटरवर अनेक युजर्सनी याबद्दल तक्रारींचा पाढा वाचला आहे.

ट्विटरवर अनेक युजरने याबद्दल तक्रार केली आहे. युजर्सनी #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. जियोव्यतिरिक्त इतर युजर्सनी आपल्या मित्र मंडळी आणि इतर व्यक्तींना फोन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणी जियोने कुठल्याही प्रकारे स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या ही समस्या फक्त मुंबई भागात दिसत आहे.

https://twitter.com/ArjunKalawat8/status/1489876705439203329?s=20&t=ALFL4Nnsj05ny8LHVMrJaw

अशा वेळी काय करावे?

जियोचे मोबाईल नेटवर्क नसल्याने ग्राहकांनी शक्यतो वायफायचा वापर करावा. घरी किंवा ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी वायफाय कनेक्ट करावे आणि व्हॉट्सऍप कॉलच्या माध्यमातून संपर्क साधावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.