जिल्हा बँक फसवणूकप्रकरणी तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0

जळगाव : जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीवरील जप्तीसाठी टाळण्यासाठी बक्षीसपत्र करुन देत फसवणुक केली होती. याप्रकरणी महावीर अर्बन को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. च्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील एका संचालकासह त्याच्या दोन्ही मुलांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

शहरातील श्री. महावीर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. या पतपेढीने जिल्हा बँकेकडून आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज थकल्यामुळे बँकेने सहकार न्यायालयात पतपेढी व संचालकांविरुद्ध दावा दाखल केला होता. त्यामध्ये सहकार न्यायालयाने सर्व संचालकांना वैयक्तीक जबाबदार धरुन कर्जाची परतफेड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संचालकांच्या मिळकतींवर बोजा लावण्यासाठी तलाठी, भूमापन
अधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. परंतु संचालकांनी मुलांसोबत संगनमत करुन दुय्यम निबंधकांकडे मिळकतीचा जूना उतारा जोडून विना मोबदला बक्षीसपत्र तयार केले. याप्रकरणी न्यायालयाने संचालकांसह त्यांच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संचालकांसह त्यांच्या मले अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संचालक सुरेंद्रकुमार लुंकड त्यांचा मुलगा रुपेश लुंकड व मुलगी सेजल लुंकड यांनी न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर जिल्हा सत्र न्या. केंद्रे यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्यायालयाने या तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.