‘तारक मेहता शो’ मधून अजून एका कलाकाराची एक्सिट

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashma) हा प्रचलित शो सर्वांच्या पसंतीचा आहे. प्रत्येक कलाकार आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आहे. पण काही वर्षांपासुन ह्या शो ला घेऊन बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. ‘दया बेन’ उर्फ दिशा वकानी (Disha Vakani) यांनी शो सोडल्यानंतर ‘शैलेश लोढा’ (Shailesh Lodha) यांनी सुद्धा शो सोडला आहे. आणि यात आता अजून भर पडली आहे ती म्हणजेच मिसेस रोशन यांची मिसेस रोशनच पात्र साकारणाऱ्या ‘जेनीफर मिस्त्री’ (Jennifer Mistry) यांनी सुद्धा हा शो सोडल्याचे सांगत निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहे. जेनिफर याबाबी लैंगिक छळ केल्याचा आरोप निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumar Modi) यांच्यावर केला आहे. तिने असित मोदी यांच्या प्रोडक्शन टीममधील दोन लोकांविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाली जेनिफर मिस्त्री
एका मुलाखतीत तीने सांगितले कि ” माझा १४ वर्षांचा वनवास अखेर संपला, मी खूप खुश आहे. खरं तर हे लोक खूप शक्तिशाली आहे. ते तुम्हाला घाबरावतात, त्यांच्या विरुद्ध तोंड कसे उघडावे या विचाराने मी घाबरून जायचे. पण हळूहळू माझा संयमाचा बांध फुटला आणि आता भीतीही सुद्धा संपली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.