लगान फेम अभिनेत्याचे निधन…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे मंगळवारी, १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले. अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसलेल्या जावेदला श्वसनाचा त्रास होत होता आणि गेल्या एक वर्षापासून ते अंथरुणाला खिळलेले होते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, 60 वर्षीय जावेद यांना सांताक्रूझ येथील सूर्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती.

या चित्रपटांमध्ये काम केले

जावेदने जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले होते आणि ते टीव्ही जगतातही होते. त्याने ‘नुक्कड’, ‘शक्तिमान’ आणि ‘विष्णू पुराण’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले होते.

जावेद ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘चक दे ​​इंडिया’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

याशिवाय ‘लगान’, ‘फिर हेरा फेरी’, ‘हॅलो ब्रदर’, ‘हम हैं राही प्यार के’, ‘लाडला’ आणि इतर चित्रपटांमध्येही काम केले.

Leave A Reply

Your email address will not be published.