मंडपात पोहचण्याआधीच नवरदेवाच्या गाडीला आग…

0

 

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

अमरावती (Amravati) येथून मालेगावला (Malegaon)नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या एम.एच.२७ बी. व्ही.७९५६ या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून यातून नवरदेवासह पाच जण सुखरुप बचावले आहेत. ही थरारक घटना मंगळवारी पहाटे सहा वाजता कजगाव ता.भडगाव नजीक घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अमरावती येथील रोहन हरि डेंडुळे यांचे आज मालेगाव येथे लग्न होते. त्यासाठी ते नातेवाईकांसह एम.एच.२७ बी. व्ही.७९५६ या इनोव्हा गाडीने निघाले होते. कजगाव नजीक गाडीमध्ये वायर जळाल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूला घेत होता. यादरम्यानच कारने पेट घेतला चालकाने लागलीच कारमधील पाचही जणांना खाली उतरवले आणि काही मिनिटातच कार जळून खाक झाली.

कारला लागलेली आग विझवण्यासाठी रस्त्यावर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कार काहि मिनिटात जळुन खाक झाली. यावेळी मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या थरारक घटनेतून नवरदेव रोहन डेंडुळे, आकाश शिवदास डेंडुळे, पूजा आकाश डेंडुळे, वैशाली अमर बागरे आणि चालक राहुल वैराळे असे पाच जण सुखरुप बचावले आहेत. मागून आलेल्या वरातीच्या वाहनातून नवरदेव व इतर लोक मालेगावकडे रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.