‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक जसिक बाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण (sexual abuse) प्रकरणी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेची बातमी चाहत्यांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. संबंधित अल्पवयीन मुलीला चित्रपटात काम देण्याच्या अमिषानं दिग्दर्शकाने तिचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तक्रार दाखल केल्यांनतर दिग्दर्शक जसिक हा काही दिवस फरार होता. पोलिसांनी त्याच्या शोध घेऊन त्याला अटक केली आहे. सध्या त्याला पोस्को काद्यानुसार न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

३६ वर्षीय जसिक अलीवर लैंगिक छळाचे आरोप झाल्यांनतर तमिळ चित्रपट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पीडितेला चित्रपटात महत्वाची भूमिका देणायचे अमिष त्यानं दाखवले होत. जसिक हा मुळचा कुरुंगवाडचा असून त्याला कोझिकडेमधून अटक करण्यात आली आहे. कोयिलेंडे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जासिकनं पीडितेला चित्रपटात काम देण्याचे अमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले.

Leave A Reply

Your email address will not be published.