वाघुर सिंचन योजना पुर्णत्वासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जामनेर तालुका विधानसभा मतदारसंघातील वाघुर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी त्वरित मिळावा यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे जामनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वेळोवेळी मंत्रालयास भेटी देऊन सिंचन योजना पुर्णत्वासाठी पाठपुरावा करण्यात आला.

या पाठपुराव्यास यश मिळाले असुन जलसंपदा विभागाच्या मार्फत नुकताच सदरील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तब्बल ९० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जामनेर तालुक्यातील सुमारे २९ गावांमध्ये २०२० शेततळ्यांवरील निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे १०१०० हेक्टर सिंचनाखाली येणार असल्यामुळे प्रत्यक्ष लाभ शेतकर्‍यांना होणार आहे. तसेच या शेततळ्यांना चेक आऊटलेट पासून पाणीपुरवठा करणारी ६८ कोटी रुपयांची पाईपलाईन सुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जामनेर तालुक्याच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे.

त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी जयंत पाटील तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. सदरील पाठपुराव्याकामी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस सागर कुमावत, शहराध्यक्ष पप्पु पाटील, कार्याध्यक्ष दत्ता साबळे, यांचे अनमोल सहकार्य लाभले.

या पाठपुराव्याची योग्य ती दखल घेऊन त्वरित निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्या बद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.