Saturday, January 28, 2023

उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला CBI कडून दिलासा

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना सीबीआयनं दिलासा दिलाय. मात्र, या प्रकरणी तपास सुरूच राहणार आहे. पाटणकर यांच्याविरोधात कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा (क्लोजर रिपोर्ट) अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) दिलाय.

कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा या प्रकरणी रिपोर्ट सीबीआयकडून (CBI) कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. कोर्टानंही तो स्वीकारलाय. हे 84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरण आहे. ईडीचा विरोध असूनही विशेष सीबीआय न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. श्रीधर पाटणकर व्यवसायानं बिल्डर आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्यानं त्यांचे प्रकल्प आहेत.

- Advertisement -

या प्रकरणी ईडीनं (ED) युनियन बँकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याचा तपास सुरू झाला. ईडीनं कारवाई दरम्यान श्रीधर पाटणकर यांची साडेसहा कोटींची मालमत्ता जप्त केली. पण, आता पाटणकर यांना या प्रकरणी सीबीआयकडून दिलासा मिळालाय. पाटणकर गेल्या काही महिन्यापासून सीबीआय, ईडीच्या रडार होते.

नेमकं प्रकरण काय ? 

चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमतानं पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीत तब्बल 20 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. ही रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले असल्याचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं, असा आरोप आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे