भाजपाचा ४४ वा स्थापना दिन मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साजरा

0

जामनेर, लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

भारतीय जनता पार्टीचा (BJP) ४४ वा स्थापना दिन ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण करीत उत्साहात साजरा करण्यात आला. पुर्वी भारतीय जनता पक्षाचे जनसंघ हे नांव होते. तत्कालीन पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ६ एप्रिल १९७७ साली भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा पासून पक्षाची विजयी पताका सतत निरंतर फडकत राहिली. काही राज्यांपुरता मर्यादित राहिलेला पक्ष आज केवळ देशात नाही तर हा पक्ष जगभरात कार्यकर्त्यांच्या बाबतीत सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी देशाचे कर्तव्यशिल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सर्वत्र भाजपाचे कार्यकर्ते व देशवासियांना भाजपाच्या स्थापना दिनाचे महत्त्व भाषणातून आपले मौलिक विचार मांडुन व मनोगत व्यक्त केले.

भाजपाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रतिम विचार ऐकविण्यासाठी दुरदर्शन टि. व्ही. संचयाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या रांगेत बसुन पंतप्रधानांनी संबोधलेले अनमोल विचारांचा लाभ घेतला. भाजपाच्या ४४ वा स्थापना दिन म्हणून ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या समर्थनार्थ विर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा समारोप श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयात करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन, जेष्ठ नेते शिवाजी नाना सोनार, गोविंद अग्रवाल, जे. के. चव्हाण, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, शहराध्यक्ष आतिश झाल्टे, नगरसेवक बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, सुहास पाटील,दिपक तायडे, रमेश नाईक, किशोर नाईक निलेश चव्हाण, नगरसेविका लीना पाटील, मंगला माळी, वैशाली चौधरी, पल्लवी सुर्यवंशी, नवल पाटील, मनोहर माळी रविंद्र झाल्टे, सुभाष पवार, कैलास पालवे, विजय शिरसाठ, अजय नाईक, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.