भीषण अपघात: 300 फूट खोल दरीत बस कोसळली; 36 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

0

जम्मू काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय. जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार भागात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस 300 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना  स्त्यावरून घसरून बस दरीत कोसळली. बसमध्ये 55 प्रवासी होते. घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. हा अपघात एवढा भीषण होता की बसला कापून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. बसच्या अर्ध्या भागाचा चुराडा झाला आहे. लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडले आहेत.

https://x.com/ddnews_jammu/status/1724690545367527830?t=I_dgd-r6Po9mCrmVdq5cDA&s=08

मिळालेल्या माहितीनुसार,  जखमींना किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.