जालन्यातील घटना दुर्देवी, फडणवीसांनी मागितली माफी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्यांची मी माफी मागतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितले आहे. याठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केलं आहे. हे आंदोलन सुरु असतांना पोलिसांनी लाठीजार्ज केला आणि अश्रूधूराच्या नळकांड्या फोडला. हे अत्यंत चुकीचे होते.

अशा प्रकारच्या बळाचं वापर करण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. यापूर्वीही पाच वर्षे मी गृहमंत्री होतो आणि जवळपास २ हजार आंदोलनं ही आरक्षणाच्या संदर्भातली झाली होती. परंतू कधीही आम्ही बळाचा उपयोग आम्ही केला नाही. आत्ताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. सर्वात आधी ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे इजा झाली आहे, जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रति मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा निर्णयही घेण्यात आला आहे अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. राज्याचे विविध महाधिवक्ता, छत्रपती उदयनराजे भोसले, काही काळाकरता संभाजीराजेही उपस्थित होते. विविध अधिकारी होते. मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेली परिस्थिती आहे त्यावर चर्चा झाली. जालन्यातल्या आंदोलनावरही सखोल चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.