संतापजनक; ९ वर्षीय बालिकेवर नातेवाइकानेच केला अत्याचार, आरोपीस अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होतांना दिसत आहे. सोबतच महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत सुद्धा वाढ होत आहे. नुकतच पाचोरा शहरातील एका भागातील ९ वर्षीय बालिकेवर नात्यात असणाऱ्या १८ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. रविवार दि. ३ रोजी घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अल्पवयीन पीडितेच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. सोबतच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनुसार, ९ वर्षीय बालिकेचे आई- वडील बाहेरगावी गेल्याने बालिकेस याच परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते. रविवारी दुपारी बालिका व तिचा नातेवाईक असलेला युवक घरात एकटेच असल्याने त्याच्या फायदा घेऊन बालिकेवर अतिप्रसंग करण्यात आला. भयभीत झालेल्या बालिकेने आपबिती सांगितल्यानंतर संध्याकाळी पोलिसात पीडितेच्या आईने गुन्हा दाखल केला. आरोपीस त्याच वेळी अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक एकाहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.