उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय समितीचा -विजय चौधरी

0

जळगाव : आगामी निवडणूकांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय समितीचा असेल. आपल्यालाच तिकिट मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते, ती व्यक्त करणे गैरही नाही, परंतु अंतिम निर्णय पक्षच घेतो. असे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची माहिती, शासकीय योजनाचा लाभ कसा घ्यावा याची यासाठी विधानसभानिहाय १०० सुपर वॉरीअर्स नियुक्त केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर चौधरी जळगाव दौऱ्यावर आले असता गुरुवारी त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेर, अमोल जावळे, महानगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

विधानसभा, लोकसभा निवडणूकीत कोणता उमेदवार द्यावा, किती जागा लढवाव्यात याचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय कोअर समिती घेते. राज्यात तीन पक्षाची युती आहे. त्यामुळे कोणाला किती जागांचे वाटप होईल हे वरिष्ठ नेतेच ठरवितील. तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनाच्या माहितीसाठी सरल ॲप सुरू केले आहे. त्याचीही माहिती या वॉरीअर्सकडून देण्यात येणार आहे. या योजना नागरीकांपर्यत कश्या पोहचतील, त्यांचा लाभ कसा घ्यावा याची माहितीही यातून देण्यात येणार आहे.

दरम्यान प्रदेशाध्यश चंद्रशेखर बावनकुळे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ५ नोव्हेंबरला रावेर, ६ ला जळगाव, ७ ला धुळे, ८ ला नंदुरबार व ९ ला इंदौर असा त्यांचा दौरा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.