खान्देशात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ दिवशी ऑरेंज आणि यलाे अलर्ट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून खान्देशात पावसाने चांगली हजेरी लावल्याने चैतन्य निर्माण झाले आहे. काेकण आणि मुंबईत अतिवृष्टी होत असताना आता मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातदेखील पावसाने जाेर पकडला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये खान्देशात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर रविवार आणि साेमवारी मुसळधार पावसाचा यलाे अलर्ट देण्यात आला आहे.

यंदा जुलैचा पहिला आठवडा समाधानकारक पावसाचा राहिला आहे. जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जळगाव तालुक्यात दोन वेळा दमदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जळगाव शहरात दुपारी २ वाजेपासून जाेरदार पावसाला प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भाग, उपनगरांमध्ये जाेरदार पाऊस झाला. तीन तासांमध्ये २० मिलिमीटर पाऊस झाला. शहरात सलग चाैथ्या दिवशी पाऊस झाला.

जळगाव तालुक्यात सर्वाधिक ३३.१ टक्के पाऊस  झाला. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.